ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर ( प्लॉट) वरुन पिंपळगांव (को) कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टर वरून ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार ६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. ट्रॅक्टर चालक खेडचंद शेडमाके हा ट्रॅक्टर नियंत्रित करण्याच्या बेतात असताना अचानक उसळून ट्रॅक्टर खाली पडला व यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काही लोकांनी खेडचांद शेळमाके याद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची मागील पटांगणावर घडली. खेडचंद शेडमाके वय ( २९ ) रा. धाबेटेकडी ता . अर्जुनी असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार,पिंपळगाव ( को.) निवासी आशिष परशुरामकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर मध्ये घरगुती कामाकरीता विटा भरून लाखांदूर वरून पिंपळगाव ( को .) कडे जात असताना लाखांदूर येथील शव विच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावरील रस्त्यावर भरधाव माहिती प्राप्त झाली आहे. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जगणे यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली आहे.पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत. आज होळीच्या पहिल्याच दिवशी अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यांत हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *