राज्यातील पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात अली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील अनेक वर्तमान पत्रांमध्ये या संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डीजी आॅफिसमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सदर माहिती दिली आहे. राज्यभरात १८ हजार ३३१ पोलिसांची भरती होणार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाºयांनी दिली आहे. या पद भरतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची तयारी केली आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *