महावितरणचा एचव्हीडीएस प्रकल्प अत्यंत उपयुक्त वर्ल्ड एशियन डेव्हलपमेंट बँकच्या संचालकांकडून कौतुक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : एचव्हीडीएसच्या माध्यमातून शेतकºयांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा होत असून ही अत्यंत उपयुक्त योजना आहे आणि महावितरणच्या माध्यमातून या योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे कौतुक वर्ल्ड एशियन डेव्हलपमेंट बँकच्या संचालकांकडून करण्यात आले. वर्ल्ड एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसाह्यातून महावितरणकडून एचव्हीडीएस योजनेच्या माध्यमातून कृषी पंपांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा दिला जात आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी वर्ल्ड एशियन डेव्हलपमेंट बँकचे कार्यकारी संचालक समीर कुमार खरे, चांतेल वोन्ग, सुरेगिओ लुगरेसी, बौडीकफेंग चांसावत, ताकाहिरो यासूई, यांनी नुकताच नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी एचव्हीडीएस कृषी पंप बसविण्यात आलेल्या कळमेश्वर तालुक्यातील सावंगी गावाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी कृषी पंपांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. वर्ल्ड एशियन डेव्हलपमेंट बँकच्या ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक ज्योतिर्मय बॅनर्जी यांनी या दौºयाचे संयोजन केले होते. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी यावेळी एचव्हीडीएस योजनेची व त्यामुळे शेतकºयांना होणाºया लाभाची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता अविनाश सहारे, मुंबई मुख्यालयातील कार्यकारी अभियंता बांगर, सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे, उपकाकार्यकारी अभियंता पंकज होनाडे, स्वाती पडलमवार व अमित बागवे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *