कारच्या धडकेत पादचारी ठार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील मानेगाव / सडक येथे स्विफ्ट डिझायर कारने पायी जाणाºया युवकाला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मरण पावल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता सुमारास मानेगाव येथील जनसुविधा केंद्राजवळ घडली. हेमंत परसराम गायधणे वय ३५ वर्ष रा. मानेगाव /सडक असे अपघातातील मृतकाचे नाव आहे. हेमंत गायधणे हे मजुरीचे काम करीत होते. मजुरीच्या कामावरून घराकडे परत जात असताना लाखनी कडून साकोलीकडे जाणाºया स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच ३६ झेड ७४१५ ने समारोसमोर धडक दिली. यात हेमंत गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार करून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली असून लाखनी पोलिसांनी कमल परसराम गायधणे यांच्या तक्रारीवरून स्विफ्ट डिझायर कार चालकाविरुद्ध अप. क्र. २२०/२०२२ कलम २७९, ३०४ (अ) भादवि सहकलम १८४ मोटरवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *