सभापती रितेश वासनिक यांच्यावरचा अविश्वास बारगळला

यशवंत थोटे मोहाडी : येथील पंचायत समितीमधील अविश्वास प्रस्तावामागील राजकारण दिवसेंदिवस रंगत असलेली चर्चा संपुष्टात आली. सत्तापक्षातील सदस्यांच्या मदतीनेच विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव परतवून लावण्यासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार राजू माणिकराव कारेमोरे आणि पक्षातील पदाधिकाºयांकडून प्रयत्नाला यश प्राप्त झाले. आज शुक्रवार दि.१८ आॅगस्ट २०२३ ला दुपारी २ वाजता राष्ट्रवादी पक्षाचे समिती सदस्य वंदना राजू सोयाम तटस्थ राहिले. राष्ट्रवादी पक्षाचे समिती सदस्य आशा बोंदरे, उमेश भोंगाडे सभेला अनुपस्थित होते. अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादीचे प्रिती शेंडे, भारतीय जनता पक्षाचे उपसभापती विठ्ठल मलेवार, रेवानंद चकोले, विस्मा सेलोकर, छाया तडस, कौतिका मंडलेकर, दुर्गा बुराडे, जगदीश शेंडे, कैलास झंझाड या नऊ सदस्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत बंडात साथ देऊन अविश्वास बाजूने हाथ वरती केले. गुरुवार दि.३ आॅगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकाºयांकडे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल करून बाराही सदस्य भ्रमंतीवर बाहेर पडले होते.

यानंतर सत्ता पक्षाकडून सर्व आयुधांचा वापर केला गेला. आज विशेष सभा पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तेळे, सचिव म्हणून खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. १४ पंचायत समिती सदस्यांपैकी १२ सदस्य सभागृहात हजर होते. विश्वासाच्या बाजूने सत्ता पक्षाचे सभापती रितेश भाऊराव वासनिक व राष्ट्रवादीचे एकमेव सदस्य बाणा सव्वालाखे असे दोनच सदस्य होते. आजपर्यंतच्या मोहाडी पंचायत समिती सभापतीचा ६१ वर्षांचा कार्यकाळ झाला असून पंचायत समितीचे चौथे सभापती राहिलेले रामाजी गायधने (१९७९- १९९०) सलग अकरा वर्षे सभापती राहिले होते. त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. तो प्रस्ताव बारगळला होता. त्यानंतर ३३ वर्षांनी सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची ही दुसरी वेळ होती. अविश्वास ठराव बारगडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांचे विश्वासू रितेश भाऊराव वासनिक हे अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात यशस्वी ठरलेत.

दरम्यान पर्यटनाला गेलेले बाराही सदस्य ज्यावेळी आपल्या समर्थकांसह मोहाडी पंचायत समितीच्या परिसरात पोहोचलेत, त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.अविश्वास ठरावानंतर एका महिला सदस्यासह पुरुष सदस्याचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये,यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. यावेळी सभापती रितेश वासनिक यांनी पर्यटनावरून परतलेल्या सदस्यांना सभागृहातच्या बाहेर थांवबून चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुळ यांनी त्यांना अडवून कॉलर पडकुन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना शांत केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.