पशुपालकांनी शेतीसोबत पशुपालनाकडे जोड व्यवसाय म्हणून बघावे – खा. मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी शासन विविध योजना राबवीत असते. ग्रामीण भागातील शेतकºयांचा मूळ व्यवसाय दुग्ध व शेळीपालन हे शेतकºयांना प्रगतीकडे नेणारा व त्यांच्या हक्काच्या व्यवसाय आहे असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पवनी च्या वतीने तालुकास्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी चे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आसगाव येथे केले. चांगल्या पशुधनासाठी काही पशुपालकांना पुरस्कृत करण्यात आले पशुपालकांनी शेतीसोबत पशुपालनाकडे जोड व्यवसाय म्हणून बघावे. भंडारा जिल्हयात चारा उत्पादनाला प्रचंड वाव असून आपल्या जिल्हयाची गरज भागवून इतर जिल्हयांना चारा पुरवठा करण्याची क्षमता आहे. चारा उत्पादनातून सुध्दा मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होवू शकतो त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे असे आव्हान यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी केले. यावेळी गंगाधर जिभकाटे, जि.प.अध्यक्ष, संजय भेंडे, सौ.संगीता बोरकर, सौ.निशिता कोरे, विनोद बागडे, जगन्नाथ देशट्टीवार, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, यिशूदेव वंजारी, धर्मेंद्र नंदरधने, मोहन कापगते, बादल ढवरे, चंद्रशेखर पड़ोळे, देवीदास टेकाम व सबंधित विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *