आखिर ‘सिक्का चलेगा तो पटेल काही चलेगा’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नुकत्याच राज्यात झालेल्या जिल्हा प्रभारींच्या पक्षीय नियुत्तश्वयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांची नियुक्ती भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी म्हणून करण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले असून जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात अजित पवार गट विरूध्द शरद पवार गट अशी चुरस निर्माण होईल ही शंका निर्माण झाली असून खा. प्रफुल्ल पटेलांच्या गडामध्ये रोहीत पवाराच्या एन्ट्रीने जिल्ह्याचे वातावरण २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वीच तापल्याचे सर्वत्र दिसत आहे. परंतु गड खा. पटेलांचा असल्याने अखेर ‘सिक्का चलता है तो पटेल का’ हे सगळ्यांनाच माहित आहे. राज्यात २०२४ च्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्ष राजकारणाचे धागे -दोरे सांभाळण्यात तत्पर होतांना दिसून येत आहे. त्यातच राज्यात जिल्हा प्रभारीच्या नियुत्तश्वया जोरावर असून नुकतीच भंडारा-गोंदिया जिल्हा प्रभारी म्हणून आ. रोहीत पवार यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात राजकारणाचे वातावरण तापत असल्याचे चिन्ह दिसत असून खा. पटेलांचा गड शरद पवार गट आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीला लागल्याचे चिन्ह दिसते.

त्यासाठी शरद पवारांच्या अतीशय जवळ असलेले किंबहूना भविष्यात त्यांचे राजकीय वारस होतील ही ताकद असणारे आ. रोहीत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून शरद पवार गट खा. प्रफुल्ल पटेलांच्या मागे हातधुवून लागला काय? असे म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांना आली आहे. परंतु यातून साध्य काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खा. पटेलांची पकड अतिशय मजबूत असून त्यांनी आजवर केलेल्या राजकीय कार्याचा आढावा घेतला असता खा. पटेल हे जिल्हावासीयांसाठी कौटुंबिक वात्सल्य प्रमुख असल्याने खा. पटेल म्हणतील तेच जिल्ह्यात घडते. त्यामुळे ‘सिक्का चलेगा तो पटेल काही चलेगा’ अशी म्हण जनसामान्यात रूढ झाली आहे. त्यामुळेच भंडारा- गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे जिल्हा प्रभारी म्हणून खा. पटेल स्वत:च मैदानात असून २०२४ च्या होणाºया लोकसभा निवडणूकीसाठी त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरू झाले असून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या ताकदीनिशी अजित पवार गटासोबत उभा असल्याचे चित्र दिसून येते. ते फक्त प्रफुल्ल पटेल यांच्या करिश्म्यामुळे.

भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खा. पटेलांव्यतिरिक्त दुुसरा कोणताही पर्याय नसल्याचे प्रत्येक पक्षाला माहित असल्याने जिल्हा प्रभारीची निवड करतांना विचारपुर्वक करावी लागते. खा. प्रफुल्ल पटेल हे मा. शरदचंद्र पवार यांच्या अतिशय जवळचे राहिले असून आज फक्त राजकारणाच्या हव्यासापोटी खा. पटेल आणि शरदचंद्र पवार हे दोन्ही ही वेगवेगळ्या गटाचे सर्वेसर्वा झाले आहे. मा. शरदचंद्र पवार यांचे बोट धरून आलेले आणि राजकारणावर आपला कायमचा शिक्का उमटवीलेले खा. प्रफुल्ल पटेल आणि शरदचंद्र पवार यांच्यातील नातं हे जिव्हाळ्याचं असून राजकारणासाठी ते तुटू नये ही अपेक्षा आपण करूया. परंतु आ. अजित पवार हे सुध्दा मा. शरदचंद्र पवार यांच्या अतिशय जवळचे असून त्यांची भंडारा- गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करणे हे येणाºया भविष्यात दोन्ही गटामध्ये किंबहूना दोन्ही नेत्यांमध्ये वित्तुष्ट निर्माण करते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. आपण २०२४ च्या येणाºया निवडणूकीमध्ये काय घडते यासाठी वाट पाहूया.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *