पुरात दुचाकी टाकणे जीवावर बेतले; दोघांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सेल : वाहत्या पाण्यात पुलावरून दुचाकी टाकण्याचे धाडस दोघांच्या जीवावर बेतल्याची घटना काल सोमवार २१ रोजी रात्री बोरधरण परिसरात घडली. दुचाकीसह वाहत गेल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे आज मंगळवार सकाळी उघडकीस आले. अंकुश नागो चौधरी (६२) रा. बोरी कोकाटे व इसराईल इसमाईल पठाण(५२) रा. हिंगणी अशी मृतकांची नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश आणि इसराईल हे दोघेही २१ रोजी रात्री एम. एच. ३२ एच.व्ही. १३१० क्रमांकाच्या दुचाकीने सालईकडून बोरधरण मार्गे हिंगणीकडे परत येत होते. काल सकाळ पासूनच बोरधरणातील पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात आल्याने सालई ते बोरी मार्गावरील पुलावरून कमरेच्यावर पाणी वाहत होते. पूल उतारावर आणि धरणाशेजारीच असल्याने पाण्याला प्रचंड ओढ होती. अशातच रात्री त्या दोघांनीही दुचाकीसह पूल पार करण्याचे धाडस केले आणि दोघेही दुचाकीसह वाहून गेले. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास बोरी येथील नागरिक नदीच्या पात्रात मासोळ्या शोधण्यासाठी गेले असता दोघांचेही मृतदेह पुलापासून ३०० मीटरच्या अंतरावर झाडाच्या फांद्यात तर दुचाकी नदीत आढळून आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *