तलावात पोहण्याच्या नादात जीव गमावला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आदित्य उमाशंकर शर्मा (१८, रा. सिर्सीनगर, बुटीबोरी), असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (दि.१३) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या दुचाकीने चार मित्र मकरधोकडा तलावाच्या दिशेने आले. मृत आदित्य शर्मा याच्यासोबत बुटीबोरी येथील हिमांशू यादव, सुमित सोनटक्के आणि अनीश कौशद हे तिघे होते. काही वेळ चौघांनीही आनंद साजरा केला. तलावाच्या किनाºयालगत असलेल्या पाइपलाइनवर चौघेही बसले. काही वेळातच आदित्य तलावात पोहण्यासाठी गेला. यातच तो खोल खड्डा असलेल्या पाण्यात गेला. मित्रांनी आदित्यला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तत्पूर्वी, क्षणभरातच आदित्य तलावाच्या पाण्यात दिसेनासा झाला. तलावाच्या काही अंतरावरच मोठ्या खड्डयाचे खोदकाम केले गेलेआहे. यामुळे हा परिसर धोकादायक आहे. आदित्यचा शोध घेण्यासाठी मकरधोकडा येथील नागरिकांनी बरेच प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *