दोन महिन्याच्या बाळाची तस्करी करून विक्रीचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकांत २ महिण्याच्या नवजात बालकाची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. बालकाची १० हजार ५०० रूपयांमध्ये विजयवाडा येथे विक्री करणार होते. चंद्रकांत मोहन पटेल (४०) रा. इंदिरानगर संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई, दौपदी राजा मेश्राम, (४०) आयबीएम रोड, धम्म नगर गिट्टी खदान, काटोल रोड नागपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. २५ डिसेंबरला १२६५५ या क्रमांकाच्या नवजीवन एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक ५ व ६ मध्ये एक दाम्पत्यनवजात बालकाला सोबत घेत प्रवास करीत होते. सदर दाम्पत्य हे विजयवाडा येथे जात होते. सदर दाम्पत्य हे नवजात बालकांची तस्करी करून विक्री करण्यासाठी नेत असल्याची तक्रार नागपूर रेल्वेपोलिसांना मिळाली. तात्काळ बल्लारपूर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान रेल्वेचे पोलिस अधिकारी बोगीमध्ये जावून चौकशी केली असता त्यांनी स्वत:ला पती-पत्नी असल्याचे सांगितले.मात्र त्यांच्यासोबत असलेले २ महिन्याचे नवजात बालक हे सतत रडत असल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करीत मोबाईल तपासून पाहिला असता, त्यामध्ये मुलाला विजयवाडा येथे विक्री करणार असल्याचे नमदू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनीही नवजात बाळाला विक्री करणार असल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपी हे १० हजार ५०० रूपयांना नवजता बाळाची विक्री ही विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याकडे करणार होते. ही कारवाई रेल्वे पोलीस मानव तस्करी विभागाचे प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, रेल्वे पोलीस राठोड यांच्या पथकाने केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.