यवतमाळात मुख्याधिकाºयांच्या पदभारावरुन ‘राडा’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : येथील नगर परिषदेच्या मुह्ययाधिकारी माधुरी मडावी यांची अमरावती येथे सहाय्यक आयुक्त पदावर बदली झाल्याचे आदेश मंगळवारी धडकले. त्यामुळे बुधवार, २१ सप्टेंबर रोजी नवे मुह्ययाधिकारी दादाराव डोल्हारकर पदभार स्वीकारण्याकरिता आल्याने परिषदेत चांगला राडा झाला. मुह्ययाधिकारी माधुरी मडावी यांनी डोल्हारकर हे शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याची तकह्यार पोलिसांकडे केली आहे.नगर परिषद मुख्याधिकारी मडावी या आपल्या कक्षात बसून होत्या. त्यावेळी नवे मुख्याधिकारी डोल्हारकर पदभार घेण्याकरिता आले. मात्र, मडावी खुर्चीवरून उठल्या नाहीत. त्यामुळे डोल्हारकर यांनी स्वत: दुसरी खुर्ची आणून पदभार स्वीकारला. या प्रका-रामुळे मडावी यांनी शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याची तकह्यार डोल्हारकरांविरुद्ध दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ नप मुह्ययाधिकाºयांच्या बदलीवरुन राजकारण तापले आहे. बुधवारी पदभार स्वीकारण्यावरूनही चांगलाच राडा झाला. मावळत्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शासनाने दिलेल्या आदेशावर स्थगिती मिळावी याकरिता न्यायालयाचा मार्गसुद्धा स्वीकारला. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे माधुरी मडावी यांना अमरावती येथील पदभार स्वीकारावा लागेल अशी नप वतुर्ळात चर्चा होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *