अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार हे भाग्य : खा.मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नवभारताचे स्वप्न साकार करणा-या संसदेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पाहण्याचा क्षण विलक्षण होता. खासदार म्हणून हा क्षण अनुभवताना जी अनुभूती आली, ती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या प्रेमामुळेच शक्य झाली, असे खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २८ मे रोजी संसदेच्या नव्या आणि अत्याधुनिक अशा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून हा क्षण डोळ्यात साठविण्याची संधी मिळालेल्या खासदार सुनील मेंढे यांनी या अनुभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. भंडारा गोंदिया मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांच्या आशिवार्दाने मिळाली.

मतदारांमुळे संसदेच्या सभागृहात पोहोचलेल्या मला अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होण्याचा मान मिळाला. कोटयवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचा निर्णय याचकाळात झाला. कश्मीरातील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाचा मी प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार आहे. कल्याणकारी निर्णय सभागृहात घेतली जात असताना माझी उपस्थिती असल्याने ख-या अर्थाने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आज नव्या भारताच्या निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पाऊल असलेल्या नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले लोकार्पणही याची डोळा पाहण्याचा योग आला. भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरा यांनी भरलेल्या या सोहळ्यात देशभक्ती ओतप्रोत दिसत होती. हा अनुभव घेण्याची संधी मतदारांमुळे मिळाली यासाठी खड्ढया अथार्ने याचे श्रेय त्यांना द्यायला हवे. खासदार म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयांचा मी प्रत्यक्षदर्शी म्हणून स्वत:ला भाग्यवान समजतो. संसदेची ही नवी इमारत कायम प्रेरणादायी ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.