जि.प.हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब मुंडे यांचा सन्मान क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील वरठी येथील जि.प.हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक बाळासाहेब यशवंत मुंडे यांना महाराष्ट्र शासन-शालेय शिक्षण विभागाद्वारा शुक्रवार दि २४ फेब्रुवारी २०२३ ला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२१-२२ रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग, रिक्लमेशन(प.) बांद्रा,मुंबई येथे मंगलप्रभात लोढा-मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कपिल पाटील सदस्य विधानपरिषद तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव-रणजितसिंग देओल (भा.प्र.से.)यांचे शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रमुख उपस्थिती कृष्णकुमार पाटील-शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र, कौस्तुभ दिवेगावकर -संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, कैलास पगारे-राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महेश पालकर-शिक्षण संचालक, यौजना, संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई तसेच शालेय शिक्षण विभागातील अधीकारी यांचे उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
पुरस्कार स्वरूपात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रुपये एक लाख १० हजार रुपये प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून बाळासाहेब मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या यशाचे श्रेय मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक(वरठी)यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *