शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील अनेक भागात अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे हि गोष्ट लक्षात घेत भंडारा न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २६ डिसेंबर रोजी भंडारा शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान मुख्याधिका- री विनोद जाधव यांच्यासह भंडारा नगर परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय भंडारा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम,पोउपनि.भुषण कोळी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यवाहीला मुस्लीम लायब्ररी चौकातील तुरसकर मैदान इथुन सुरूवात करण्यात आली नंतरत्रिमूर्ती चौक मुस्लीम लायब्ररी चौक, मिस्कीन गार्डन परिसर, राजीव गांधी चौक, जिल्हापरिषद चौक आदि परिसरात राबविण्यात आली. सदर कार्यवाही दरम्यान मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी विक्रेत्यांना आपला व्यवसाय हा हात गाडी, हात ठेला अशा वाहनांवरून करण्याचे आवाहन ककिेल्यास सदर अनधिकृत बांधकामावर नगर परिषदेतर्फे कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा विनोद जाधव यांच्यासह नगर रचनाकार मुकेश कापसे, निखील कामडी, बांधकाम अभियंता अतुल पाटील, विद्युत अभियंता श्री दुपारे, प्रशासकीय अधिकारी गणेश मुळे, भागवत काळे, प्रवीण वायाळ, स्वप्नील इंगोले तसेच स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत गणवीर, स्वच्छता निरीक्षक भवसागर व मुकेश शेंद्रे आपल्या सर्व स्वच्छता कर्मचाºयांसह उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *