मोहाडी नगरपंचायतचे उपाध्यक्ष अखेर पायउतार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : येथील नगरपंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शैलेश दवळू गभने यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव बारा मताने पारित करण्यात आला.अविश्वास प्रस्ताव भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे नगरसेवक एकत्र येऊन नियोजनबद्ध कटकारस्थान करून करण्यात आला. मोहाडी नगरपंचायत सभागृहात सोमवार दि.२६ डिसेंबर २०२२ ला दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.अविश्वास ठरावाच्या बाजूने असनारे बारा नगरसेवक दुपारी बारा वाजता क्षणाचाही विलंब न करता सभागृहात दाखल झाले.कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने भारतीय जनता पक्षाचे आणि पदसिद्ध मोहाडी नगरपंचायतचे अध्यक्षा छाया शेखर डेकाटे,नगरसेवक ज्योतिष जयदेव नंदनवार, दिशा दिनेश निमकर,सविता विलास साठवणे,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे रेखा मनोहर हेडाऊ,वंदना कृष्णा पराते,पवन सदाशिव चव्हाण,सचिन बालचंद गायधने, मनिषा मनोहर गायधने,सुमन गणेश मेहर व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे देवश्री विजय शहारे,महेश निमजे यांनी मतदान केले.अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा नगरसेवक असल्याने प्रस्ताव मंजूर होऊन मोहाडी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश दवळू गभने यांना अखेर पायउतार व्हावे लागले.

या प्रस्तावाच्या विरोधात मोहाडी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश गभने हे उच्च न्यायालयात जाणार आहेत.परंतु या घडामोडीमुळे मोहाडी नगरपंचायतचा पुढील राजकारणात मोठा संघर्ष आणि कोणत्या नगरसेवकांनी किती कमिशनपोटी आपले स्वत:चे घर भरले ते सुद्धा पाहायला मिळणार असल्याची भाजपाच्या एका गोट्यात आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्तेमध्ये चर्चेत आले आहेत.हा अविश्वास ठराव पारित झाले असल्याने जिल्ह्यात मोहाडी नगरपंचायतचा कारभार किती अंधारात आणि किती उजेडात आहे.हे येत्या काही दिवसांत माहिती अधिकाºयाच्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि पध्दतशीरपणे माहिती मागून मोहाडी नगरपंचायतचे नगरसेवक एकमेकांचे आतील प्रकरण उघडकिस आणणार असल्याची चर्चा रंगत आहे.आता मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्ष कोण होणार? यासाठी एकराही नगरसेवक जुडवा-जुडव करण्यासाठी घरगुती आणि हॉटेलमध्ये एकत्र येऊन बैठक सुरू झाले आहेत.कोणत्या नगरसेवकांच्या घरी बैठक होतात याकरिता भाजपा एक गट पाळत ठेवणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.