नव्याने तात्काळ बूथ कमिट्या स्थापन करुन सभासद नोंदणी तात्काळ पुर्ण करा -पंचबुध्दे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यालय, तिलक वार्ड, भंडारा येथे आज दि. १२ जून २०२३ रोज सोमवारला घेण्यात आली. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुलभाई पटेल व खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची निवड झाल्याबद्दल भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्ष कार्यालयासमोर आतिषबाजी करुन आनंद साजरा करण्यात आला. भंडारा जिल्हयातील प्रत्येक गावात व वार्डात बूथ कमेटी स्थापन करण्याची जबाबदारी सर्व सेलचे अध्यक्ष व बूथ कमेटी अध्यक्ष यांनी घ्यावी.

पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी बूथ कमेटी आवश्यक आहे. निवडणुकीचे संचालन हे बूथ कमिटीच्या माध्यमातून होत असते त्यामुळे नव्याने बूथ कमेटी स्थापन करुन पक्ष संघटन मजबूत करावे व सभासद नोंदणी तात्काळ पुर्ण करावी अशी सुचना जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी केली. गावागावात बूथ कमेटी स्थापन करावी. सोबतच महिला व युवकांची बूथ कमेटी स्थापन करुन पक्ष वाढीकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच एक तास जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवावा असे अध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश महासचिव जयंत वैरागडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सरीता मदनकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा, विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी केले. यावेळी पक्ष संघटनेबाबत सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष / शहर सर्व सेलचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर बैठकीला मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.