स्वामी सीतारामदासजी महाराज २१४ वी जयंतीनिमित्त गोपालकाला व सामुहिक विवाह सोहळा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या तुमसर-बपेरा राज्यमार्गावरील मोहगाव (खदान) येथे दरवर्षीप्रमाणे ब्रम्हलीन श्री श्री १००८ श्री योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज यांची २१४ वी जयंती सोहळा त्यांच्या अदृश्य शक्तीने संपन्न होत आहे. श्री गुरु रामजी समर्थ ब्रम्हलीन श्री श्री १००८ श्री योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज २१४ वी जयंती सोहळा कार्यक्रम दि.८ ते १२ मार्च २०२३ पर्यंत वर्ष ४६ वे योगाश्रम श्री क्षेत्र मोहगाव(खदान)येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या काळातील महान संत योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज वयाच्या १६० व्या वर्षापर्यंत त्यांच्या तपाने आध्यात्मिक साधनेत लीन होते.आपल्या साधनेने या तपोभूमी मोहगाव खदानला जागृत करून या ठिकाणी खेचरी मुद्रा साधना केली. माँ नर्मदेने या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन दिले. बुधवार दि.८ मार्चला अखंड ज्योत प्रज्वलन बंडू कुंभलकर, घनश्याम मलेवार, अरविंद चकोले, देवीलाल मिश्रा यांच्या शुभहस्ते होईल. गुरुवार दि.९ व शुक्रवार दि.१० मार्चला सकाळी ६ वाजता व सायंकाळी ६ वाजता सामूहिक प्रार्थना होईल. शनिवार दि.११ मार्चला सकाळी ६ वाजता सामूहिक प्रार्थना, सकाळी ८ वाजता ग्रामदेवता पूजनवसंत पटले, रामभाऊ पटले, रंगलाल पटले, दिवाकर पटले, रामदास पटले तथा समस्त सेवकांच्या उपस्थितीत होईल. सकाळी ९ वाजता श्री श्री स्वामीजी व श्री हरिदास पहाडी महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक व मंत्रोच्चारण होईल. सकाळी १० वाजता अखंड श्रीरामचरितमानस प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता महिला मेळावा हळदीकुंकू कार्यक्रम विजया चकोले, प्रमिला शुक्ला लोहारा, किरण पटले, विजू गायधने, हेमलता पटले, मालती पटले, लीलावती पटले, लीला बिसेन, गंगा कटरे, इंदू कटरे डव्वा, माया कटरे गोंदिया यांच्या उपस्थितीत होईल. रविवार दि.१२ मार्च २०२३ ला सकाळी ६ वाजता सामूहिक प्रार्थना, सकाळी ९ वाजता अखंड श्री रामचरीत मानस समाप्ती, सकाळी १० वाजता ओरिअस हॉस्पिटल नागपूरच्या वतीने निशुल्क आरोग्य शिबिर, सकाळी ११ वाजता गोपालकाला व सामूहिक विवाह सोहळा होईल. याप्रसंगी गिरीश चंदानी मंडला, खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, आमदार राजू माणिकराव कारेमोरे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, जि.प. सदस्य सुषमा पारधी, सभापती नंदु रहांगडाले व मान्यवर गुरू परिवाराच्या उपस्थितीत होईल. दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरित करण्यात येईल. अशा या पवित्र तपोभूमीला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून विकसित करायला हवे होते. अशी भावना स्वामीजींच्या सेवक व भक्तांमधून व्यक्त होत आहे. आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन ब्रह्मलीन श्री श्री योगीराज स्वामी श्री सितारामदासजी महाराज ट्रस्ट समिती योगाश्रम मोहंगावखदानचे अनुराग(बालू)बिसेन, भाऊदास भाईलाल पटले यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *