विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील सरांडी (बू) ते ओपारा शेताशिवारातील एका विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यास वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले.वन विभागाच्या अथक प्रयत्नाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. शिकारीच्या शोधात असलेला दीड वर्षीय बिबट्या रात्रीच्या वेळेस एका साठ फूट खोल असलेल्या विहिरीत पडला असल्याची घटना मंगळवार ७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली होती.सरांडी (बू)येथील रमेश राऊत यांचे ओपारा रस्त्यावर शेत असून सध्या उन्हाळी धानाची रोवणी सुरू आहेत,. या परिसरात वावरताना सरांडी बू. येथील निवासी रमेश राऊत यांच्याओपारा रस्त्यावरील शेतात सोमवारी रात्रीच्या दरम्यान शिकारीच्या शोधात असलेला एक धाडधिप्पड बिबट्या विहिरीत पडला.
दरम्यान बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती नागरिकांना कळताच मोठी गर्दी होऊ लागली आहे.बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी लाखांदूर वन विभागाने नवेगावबांध येथील वन्य जीव संरक्षणाच्या रेस्क्यु टीमला बोलाविण्यात आले. रेस्क्यु टीम द्वारा विहिरीत पिंजरा सोडण्यात आले.अथक परिश्रम नंतर बिबट पिंजºयात जेरबंद झाला. विहिरीच्या बाहेर पिंजरा काढताच पिंजºयात जेरबंद असलेल्या बिबट्याची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.लाखांदूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शना खाली सकोलीचे सहाय्यक वनरक्षक रोशन राठोड . लाखांदूर वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक आय.जी . निर्वाण वनरक्षक जे.डी .हाते पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे . व अन्य वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेत वन कर्मचाºयांनी सुखरूप बिबट्याला विहिरीतून बाहेर काढल्या नंतर त्यास नवेगावबांध येथे नेण्यात आले.दरम्यान बिबट्याला बघण्यासाठी शेकडो पुरुषांनी एकच गर्दी करून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्याने निरीक्षक रमाकांत कोकाटे व पोलीस कर्मचाºयांना बळाचा वापर करावा लागला.जवळपास दीड ते दोन वर्षाचा असलेल्या या बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडल्या जाणार असल्याची माहिती लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी दिली.यावेळी वन विभाग व लाखांदूर पोलिसांनी संयुक्त ही कारवाई केली असून वन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.