लाखांदूर तालुक्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार !

नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; पोलिसांचा छापा, ८९० गोणी तांदूळ जप्त - Marathi News | Black market of ration grains exposed in nagpur police seized 445 quintals of rice | Latest nagpur News ...

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रेशनचा तांदूळ खरेदी विक्री आहे. प्राप्त माहितीनुसार, गरजू व गरीब करणे हा गुन्हा असला तरी अनेकजण हा गुन्हा सरेआम करतात. तर याचे मोठे जाळे सुद्धा सर्वत्र पसरले आहेत. हा व्यवसाय करणारी टोळी लाखांदूर तालुक्यात सर्वत्र सक्रिय असल्याने तालुक्यात सुद्धा या व्यवसायाचे जाळे पडल्याची ओरड आहे. मात्र, संबंधित विभागाकडून याला प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नसल्याने हा रेशनाच्य तांदळाचा कुटुंबाला किमान पोटाची खळगी भरता यावी या एकमेव उद्देशाने स्वस्त धान्य योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून अनेक कुटुंबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, काही लोक याचा गैरफायदा घेत रेशनिंगचे तांदूळ खाजगी व्यापाºयांना परस्पर विक्री करतात. आणि याच संधीचा फायदा घेवून हा तांदूळ घेणाºया व्यापाºयांची सुद्धा तालुक्यात कमी नाही. अनेक व्यापारी गावात फिरून हा व्यवसाय करतात तर कारवाई अभावी काही मोठे व्यापारी स्वत:चा काटा लावून स्थाईक व्यावसायिक बनले. असे लहान मोठे व्यावसायिकांची तालुक्यात कमी नाही. यापैकी छोटे व्यावसायिक गावात फिरून गोळा केलेला रेशनिंग चा तांदूळ मोठ्या व्यापाºयांना विक्री करतात. आणि संपूर्ण माल छुप्या मार्गाने बाहेर राज्यात किंवा येथीलच मिलर्सला विक्री केला जातो. मात्र, संबंधित विभागाकडून यावर कारवाईचाबडगा पडताना दिसत नसल्याने हा सबंध प्रकार प्रशासनाच्या नजरेत येत नसावा काय? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. गत अनेक महिन्यांपासून लाखांदूर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ खरेदी विक्रीचा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याची ओरड आहे. मात्र, तालुका प्रशासनाकडून याविषयी अद्याप कुठलीही कारवाई किव्वा चौकशी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे, अधिकाºयांच्या संगनमताने हा प्रकार चालत तर नसावा ना? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता थेट जिल्हा प्रशासनानेच याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *