विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील विरली / खुर्द येथील एका २६ वर्षीय विवाहितेने स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दरम्यान उघडकीस आली. सोनू बबलू शेंडे रा.विरली/खुर्द असे मृतक विवाहितेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार सोनू बबलू शेंडे ही गेल्या दोन तीन वर्षापासून तिचे विरली/खुर्द निवासी पती बबलू शेंडे सोबत वास्तव्य करीत होती. पती बबलू शेंडे हा टावर बांधकामाच्या कामावर जात असल्याने तो दर आठवड्यात तीन चार दिवस गावाबाहेर राहत होता. त्यामुळे सोनू घरी एकटीच राहत होती. तिचे सासू सासरे हे गावातीलच दुसºया घरी राहत आहेत. सोनू बबलू शेंडे हिने शनिवारी रात्री घरी एकटीच असताना आपल्या राहत्या घरातील बैठक खोलीत घराच्या छताला लागलेल्या पंख्याला नायलॉन दोरी बांधून त्याच दोरीने स्वत:च्या गळ्यात गळफास लाऊन आत्महत्या केली. आज रविवारी सकाळी उशिरापर्यंत सोनू झोपेतून उठली नसल्याचे लक्षात येताच शेजारच्यांनी खिडकीतून बघितले असता सोनू शेंडेचा मृतदेह हा पंख्याला लटकलेला दिसला. घटनेची माहिती गावात पसरताच महिला पुरुषांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मांदाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृतक सोनुचे पती बबलू शेंडे हे बाहेरगावी असल्याने जो पर्यंत ते गावी येत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरायचे नाही असा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी गळफास घेतलेल्या अवस्थेतच मृतदेहाचा पंचनामा केला. एका २६ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्याप जरी कळू शकले नसले तरी पोलीस तपासात कारण निष्पन्न होईल. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *