आ. भोंडेकरांच्या जन्मदिनी ‘आरोग्य संकल्प अभियान’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत आरोग्य संकल्प अभियान राबविल्या जात आहे. या अभियाना अंतर्गत २६ जून रोजी भव्य रोग निदान शिबिर, दिव्यांगांना ट्रायसिकल वितरण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंढराबोडी रोड स्थित पेस हॉस्पिटल च्या प्रांगणात सकाळी ९ ते २ वाजे पर्यंत आयोजित या शिबिराअंतर्गत सर्व प्रकारच्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून त्यांच्यावर विविध योजने मार्फत शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच जे रुग्ण योजनेत येत नाही, त्यांच्यावर आयोजका तर्फे निशुल्क शस्त्रक्रिया केली जाईल. इतकेच नाही तर भरती करण्यात येणाºया रुग्णांना राहण्याची व जेवण्याची सोय आयोजका मार्फत निशुल्क करण्यात येणार आहे. या शिबिरा दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास निधीतून ट्रायसिकल वितरित करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ सोबतच ज्या रुग्णांना शास्त्रक्रियेची गरज आहे घेण्याकरीता जिल्ह्यातील रूग्णांनी शिबिरा दरम्यान अश्या रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल.

पेस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, शासकीय रुग्णालय भंडारा तसेच दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था द्वारा संचालित शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले गेले असून या करीता नागपूर येथून डॉक्टरांची विशेष चमू येणार आहे. या शिबिरात मेडिसीन तज्ञ, हृदयरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, त्वचा रोग, बाळ रोग, कान नाक घसा, श्वसन रोग, आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याच प्रकारे आ. भोंडेकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधत विधानसभा क्षेत्राकरिता आदर्श नागरिक सन्मान पुरस्कार २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विविध क्षेत्रातील विजेते स्पर्धकांना पुरस्कृत करण्याकरीता २६ जून ला सायंकाळी ६ वाजता विवाह लॉन येथे पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभात १० वी व १२ वी या वर्गात उच्चांक मिळविणाºया विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. मानसिक रोग, न्यूरो सर्जन, दांत व मुख रोग, युरो वरील आरोग्य शिबिराचे व संपूर्ण आयोजनाचे लाभ तज्ञ तथा फिजियो थेरपी तज्ञ हे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतील. शिबिरात येणाºया घेण्याचे आवाहन आयोजकाद्वारे करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *