भरमसाठ वाढलेली तिकीट काढूनही प्रवाशांची गैरसोय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाच्या वतीने एसटी महामंडळापासून गोरगरीब सामान्य नागरिकांसाठी स्वस्तात मस्त एसटीचा प्रवास सोयीचा व सुखकर व्हावा असे धोरण व उद्देश असून प्रवाशांना उत्तम सोयी दिल्या जाईल, असे शासनासह महामंडळाकडून आत्मविश्वासाने सांगण्यात येत असले तरी राज्यातील अनेक आगारात एसटी बसला ना खिडक्या ना बसण्याची सीट अशी विदारक परिस्थिती असल्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा देण्यात एसटी महामंडळ सपशेल अपयशी ठरत आहे.

भरमसाठ वाढलेल्या तिकीट काढूनही प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊनसुखकर प्रवासासाठी सर्वप्रथम भंगार कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून बसची दुरुस्ती करावी किंवा नवीन येत आहे. बसेस उपलब्ध करुन द्याव्या, अशी मागणी प्रवासाकडून केली जात आहे. भारत डिजिटल युगात वाटचाल करीत असतांना व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतांना आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. अनेक आसनांचे कव्हर फाटले असून खिडक्याही तुटलेल्या आहे. खर्रा व पानाच्या पिचका-यांनी बस रंगलेल्या अवस्थेत असून प्रवासादरम्यान एसटीचा धक्का मारण्याची बाब नित्याचीच झाली आहे.

अशा विविध समस्या एसटी मधून प्रवास करतांना अनुभवास येतात. मात्र या समस्या सोडविण्यासाठी शासनासह महामंडळ पुढाकार घेत नसून परिणामी नादूरुस्त बसमध्ये प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्यासह जिल्ह्यातल्या आगारातील बसेस प्रवासासाठी उपलब्ध असल्या तरी आगारातील अनेक बसेस खटरा झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांना नादूरुस्त बसेस अभावी व महागडी तिकीट घेऊनही गैरसोय सहन करावी लागत आहे. अनावधानाने बसचा अपघात झाल्यास जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यासाठी बसमध्ये पूर्वी प्रथमोपचार पेटी बसवण्यात येत होत्या. मात्र सद्य:स्थितीत या प्रथमोपचचार पेट्या बसमधून गायब झाल्या असून यावरुन एसटी महामंडळाचा व शासनाचा हा दुर्लक्षित कारभार असल्याचे दिसून येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.