विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या कार्यशाळेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीची चर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आजच्या युवा तरुण पिढीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या न्याय हक्कासाठी व मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी गावा गावातील प्रत्येक तरुणांनी गाव तिथे विदर्भ राज्य आंदोलन समीतीची संगठन तयार करून येणाºया सन २०२३ या वर्षात संपुर्ण विदर्भात हजारो तरुणांंची फौज तयार करून लगतच्या तेंलगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातुन विदर्भ राज्य हा वेगळा झाला पाहीजे या दृष्टीने विदर्भातील अकरा जिल्ह्यातील ६२ आमदार व १० खासदारांना वेगळ्या विदर्भ राज्यासाठी वेठीस धरून येणाºया काळात त्यांना वेगळ्या विदर्भ राज्यासाठी भाग पाडा व त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवून त्यांची जागा दाखवा तरच वेगळा विदर्भ राज्य तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी विदर्भातील प्रत्येक गावागावातील युवा -तरुणांनी विदर्भ राज्यासाठी पेटुन उठा व विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे मातृसंघठन तयार करा, त्यामागे माझे नेहमी पाठबळ आहे असे प्रतिपादन किसान ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा विदर्भ आदोलंन समीतीचे संघटक अविनाश काकडे यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी येथिल विश्रामगृहात आयोजित विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या कार्यशाळा चर्चासत्र कार्यक्रमात केले.

कार्यक्रमात पुढे बोलताना काकडे म्हणाले विदर्भात खनिज, वनसंपदा, विज, आदी मोठ्या प्रमाणात मुबलक आहे तरी सुध्दा विदभार्तील नागरीकांना आजतागायत आर्थिक, सामाजीक, व शैक्षणिक दृष्टया पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, या प्रांताच्या मागेच राहावे लागत आहे. त्यामुळे आतातरी प्रत्येक युवा तरुणांनी जागे होऊन वेगळ्या विदर्भ राज्याची धकधकती मशाल हातात घेऊन पुढे येण्याची गरज आहे. देशभरात सामाजीक कार्य करीत असतांना अनेक आंदोलने केले अनेक राज्यात माज्यावर सव्वाशे च्या घरात गुन्हे दाखल झाले असले आज घडीला मी वेगळ्या विदर्भ राज्याची मशाल पेटविण्यासाठी विदर्भवादी, किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून वेगळ्या विदर्भ राज्य आंदोलनात उडी घेतली आहे.तरी आजच्या युवा तरुणाईने विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील गावात छोटेखानी सभा आयोजित करुन गावा गावात – पंचविस ते पन्नास युवा तरुणांची विदर्भ राज्य आंदोलन समीती तयार करा.

व येथिल नागरीकांना वेगळ्या विदर्भ राज्याचे फायदे, तोटे, व महत्व पटवून द्या. तरच भविष्यात महाराष्ट्रातुन विदर्भ राज्य वेगळा होईल असे मत अविनाश काकडे यांनी व्यक्त केले. तत्पुर्वी दैनिक देशोन्नतीचे शाखा व्यवस्थापक तथा जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम यांनी आपल्या भाषणात म्हणाले की वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढे येऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती तयार करून विदभार्तील प्रत्येक गावातील शेवटच्या लोकांपर्यंत वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी त्या कार्यक्रमाला विदर्भ आंदोलन समीतीचे संघटक तथा किसान ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अविनाश काकडे, अमिताभ पावडे, दैनिक देशोन्नतीचे शाखा व्यवस्थापक तथा जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, विदर्भ राज्य आंदोलन युवा समीती अध्यक्ष सलीम शेख, जिल्हा संघटक विनोद बाभरे, सुधीर गोमासे, देविदास लांजेवार, तुमसर तालुका अध्यक्ष जानबा बुराडे, तुमसर -मोहाडी विधानसभा अध्यक्ष सुखदेव पातरे, हिरामन सोनकुसरे, मोहाडी युवा अध्यक्ष राकेश शिंदेगणसुर, रामु पाटील,मिना बोकडे, वैशाली बोकडे, सुभाष बोकडे, अंताराम मेश्राम, तुमसर तालुका युवा अध्यक्ष पंकज राघोर्ते, संघटक शुभम सिंगनजुडे, श्रीकांत ऊके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शुभम सिंगनजुडे यांनी मानले तर उपस्थितांचे आभार राकेश शिंदेगणसुर यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *