मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, पदाधिकाºयानी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोमवारी सायंकाळीवेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केलेआहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागावी व सत्तेतुन पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्यंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *