बेला येथील मॅरेथॉन स्पर्धेत ७२ वर्षाची आजीही धावली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय बेला, ग्रामवासी व गार्गी प्रभाग संघ गणेशपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्त साधुन बेला येथील एकता मैदान येथे मॅरेथॉन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा किडा अधिकारी आशा मेश्राम यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. मान्यवर उपस्थित होत्या. महिला मॅरेथॉन स्पर्धा बेला येथील एकता मैदान ते कोरंभी रोड -पिंडकेपार ते बेला पर्यंतच्या ७ किलो मिटर अंतरापर्यंत करण्यात आली होती. यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण क्रीडामय झाले असतांना बेला येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांचा प्रचंड उत्साह अनुभवास आला. अगदी वयाची ७२ वर्ष पूर्ण केलेल्या आजी स्पर्धा पूर्ण करून परत येणाºया स्पर्धकांना व अन्य उपस्थितांंना सुदृढ आरोग्यासाठी धावण्याचा संदेश जिल्हा किडा अधिकारी आशा मेश्राम यांनी दिला. स्पधेर्तील ३५ पासून ७२ वर्षाच्या वयोगटातील महिला तसेच आजीबाईसह स्पर्धकांचा सहभाग हा बेला वासियांकरिता लक्षवेधी ठरला होता.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व रोख त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला व युवतींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पंचबुधे व प्रास्ताविक सरपंच शारदा गायधने यांनी केले तर उपस्थितांचे आभार रजनी बाभरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेकरिता ग्राम पंचायत सदस्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी फुलसुंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, भंडारा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, महिला राजसत्ता आंदोलनच्या समन्वयक रत्नमाला वैद्य, प्रभाग संघ सचिव चेतना आगलावे, प्रभाग संघ उपाध्यक्ष रोशनी बोरकर, दवडीपार ग्राम पंचायत सदस्य शारदा शेन्डे, बेला सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे इत्यादी स्पर्धक लक्षवेधी ठरली होती. देशी खेळापासून ते आज-काल तहानभूक हरवून टाकण्यास कारणीभूत ठरत असलेल्या महिला कबड्डी खेळांचा अंतर्भाव असलेल्या विविध स्पर्धांमुळे भंडारा जिल्ह्यातील बेला येथे क्रिडामय वातावरण झाले होते. या मॅरेथॉन स्पधेर्ला महिलांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता बेला येथे झालेली मॅरेथॉन स्पर्धा लक्षवेधी ठरली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सिमा नंदनवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुषमा बन्सोड महिला सेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व मैदानी खेळ घेण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धामध्ये वयाच्या ३५ पासून तर ६२ वयोगटातील ७५ महिलांचा समावेश होतो.
७ कि. मी अंतराच्या २५ ते ४० वयोगटातील स्पर्धेत प्रिती परिसे, प्रियंका गभणे व रिना बाभरे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. ४१ ते ६० वयोगटातील स्पर्धेत मेघा बान्ते, वनिता पंचबुधे, दुर्गा टांगले यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच ६१ ते ७० वयोगटातील स्पर्धेत उषा मेश्राम, पंचकुला मेश्राम, संघमित्रा उके यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच पोता रेस स्पर्धेत सुषमा कुथे, अनुसया राखडे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच या महिला हौशी कबड्डी स्पर्धेत ३ संघानी सहभाग घेतला होता. त्यात दुर्गा टांगले, मनिषा वैद्य, प्रिती शेन्डे, वनिता टांगले, हेमा आतीलकर, माधुरी बान्ते, मिनाक्षी सार्वे यांनी उत्कृष्ट कबड्डी खेळाचे प्रदर्शन करून प्रतिस्पर्धी संघावर विजय संपादन केला.
सर्व विजयी स्पर्धकांना मॅरेथॉन बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते. विविध क्षेत्रातील महिला पदाधिकारी व अधिकारी यांनी उपस्थित स्पर्धकांचा उत्साह वाढविला होता. महिलांच्या या उदंड प्रतिसादाचा सकारात्मक दृष्ट्या विचार करून जिल्ह्यातील महिलांचा सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्याकरिता महिलांनी सामाजिक, बौद्धिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच संस्कार पिढी घडविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये यांनी केले. सुप्रिया शेंडे, मनिषा, बबीता चवरे, वंदना कुथे, देवांगणाताई गाढवे, राकेश मते, जयश्री तितीरमारे, विनोद नागपुरे, धनराज गाढवे, सोपान आजबले, रूपाली ईलमे, स्नेहल मेश्राम, प्रिती सेलोकर, पुनम वनवे, पंचकुला मेश्राम, निलिमा राखडे, अल्का बोरकर, मेघा बान्ते, प्रिती नंदागवळी, सोपान आजबले, संपुर्ण कॅडर बेला, गणेशपुर, कोरंभी, दवडीपार व गावातील महिला, बेला ग्राम पंचायत बेला व गार्गी प्रभाग संघ गणेशपुरच्या सदस्यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *