मअंनिस प्रशिक्षणात भंडारा जिल्ह्याचा सहभाग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने वर्धा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले. वर्धा येथील नवभारत अध्यापक विद्यालय येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भंडारा जिल्ह्यातील युवा कार्यकर्ता नितेश बोरकर, नितेश बोरकर यांनी भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत तरुणांची कमतरता असल्याचे सांगून युवक व युवती यांचा सहभाग कमी असण्याचे कारण बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थिती हे असल्याचे सांगितले. भंडारा जिल्ह्यात संघटना बांधणीचे कार्य मोठ्यास्तरावर करण्यात येईल असा प्रशिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांनी संकल्प व्यक्त केला. राज्य पदाधिकारी विष्णुदास लोणारे, जिल्हा कार्याध्यक्ष शाहीर प्रकाश नाकतोडे, जिल्हा प्रधान सचिव प्रा.युवराज खोब्रागडे यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले. मला काही सांगायचं आहे या सदरामध्ये भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ता

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *