राष्ट्र,धर्म व संस्कृती टिकऊन ठेवने गरजेचे-चंद्रकांतदादा मोरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगात वावरत असतांना बालकांवर संस्काराचे, भारतीय संस्कृती व अस्मिता याचे धडे गिरविणे आवश्यक आहे. या कलियुगात निसगार्चा लहरीपणा, महामारी, व्यसनाधीनता यामुळे मानव विविध समस्यांनी ग्रस्त आहे व या समस्यांवर घरच्या घरी करता येणारी उपाययोजना श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मागार्तील वेदोक्त प्रश्नोत्तरी, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, आध्यात्म, शेतीशास्त्र, स्वयंरोजगार, शेतीचे वास्तुशास्त्र, पर्जन्य देवतांची उपासना या सर्व मानवी जीवनाला आरोग्यदायी, संपन्न, सुखी, परिपूर्ण करणाठया बाबींवर प्रबोधनात्मक हितगुज केले. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा ८५० वषार्पेक्षा अधिकचा इतिहास आहें श्री स्वामी समर्थ महाराज यांना अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, भक्तवत्सल्य अशा अनेक उपमा आहें स्वामीचें वर्णन करन्यास शब्द अपूरे पड़तील पन सोप्या भाषेत जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ असे आपल्या मागार्चे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आज मनुष्यावर योग्य संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल असे प्रतिपादन परम पुज्य गुरूमाऊली यांचे सगुण स्वरूप गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी केले. ते राजस्थानी भवन स्टेशन रोड भंडारा येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मीक विकास व बालसंस्कार केंद्र, भंडारा जिल्हा, बालपूरी देवी मंदीर सहकार नगर केंद्र, ग्रामसेवक कॉलोनी व अखिल भारतीय श्री स्वामीसमर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सत्संग मेळावा व अमृततुल्य हितगुज कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे सभागृहाच्या प्रवेश व्दारावर औक्षवंत करण्यात आले व विविध सणाचे वैज्ञानिक महत्त्व पटवून देणारी भारतीय अस्मिता व संस्कृती प्रदर्षनी चे अवलोकन करत व्यासपीठावर आगमन होताच श्री स्वामी समर्थाच्याजयघोषाने अख्खे सभागृह दुमदुमले होते. जगभरात श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात दिंडोरी प्रणित १५०० पेक्षाही जास्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांतून बालसंस्कार, भारतीय संस्कृती व अस्मिता, वास्तुशास्त्र, प्रश्नोत्तरी, कृषी, विवाह संस्कार, याज्ञिकी, ग्राम अभियान अशा १८ विभागांतर्गत काम सुरू आहे. भंडारा जल्ह्यातील कार्यरत केंद्राची संख्या तीन वरून अकरा पर्यंत नेऊन सामान्य नागरिकांना या विभागांच्या नि:शुल्क सेवेंचा लाभ देण्याचे आवाहन यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रशासकीय प्रमुख परम पुज्य गुरूमाऊली यांचे सगुण स्वरूप गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवेकरी व दत्त संप्रदायातील भाविकांना केले. जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भव्य सत्संग मेळावा व अमृततुल्य कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पडोळे व प्रास्ताविक निशिकांत भेदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया कायते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विजया कायते, प्रवीण पडोळे, सारंग इंगोले, विकास झलके, सचिन लेदे, मनोज साखरवाडे, राम खोपे, शकुंतला सेलोकर माया कावळे, वर्षा पंचबुध्दे, राम शेंद्रे, अरुण भेदे, पंकज तिडके, सीमा झलके, पीटेश्वरी वनवे, सोनाली कावळे, कुंटेश बोरकर, अनिकेत इलमे, अभिषेक थलाल, चैताली घरडे, ममता बावणे, कांचन हटवार व जिल्ह्यातील भाविकांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *