वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक बेजार

गोवर्धन निनावे भंडारा : सर्व सामान्य नागरिकांना शिक्षणावर लाखो रुपयाचा खर्च करावा लागत आहे. शिक्षणासोबतच आरोग्याचा खर्चही वाढत आहे. आरोग्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च येत आहे. त्यामुळे या वाढत्या खर्चामुळे सर्व सामान्य नागरिक बेजार झालेले दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून महागाई सातत्याने वाढत आहे. तर प्रत्येक क्षेत्रातील वस्तूंचे दर हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याच शैक्षणिक आरोग्य खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने व खर्चाने उत्पन्नाच्या वाढीनंतरही मात्र प्रत्येकांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व सामान्य नागरिक वाढती महागाई व खर्चामुळे त्रस्त झाले आहे. अत्याधुनिकरण व सुविधेच्या नावाखाली झपाट्याने प्रगती करीत असलेला प्रत्येक व्यक्ती आता महागाई व वाढत्या खर्चामुळे त्रस्त झाला आहे. मनुष्याचे दरडोही उत्पन्न वाढले आहे. शेतकºयांच्या शेतमालाचे उत्पादन वाढल्याने उत्पन्न वाढले आहे. मजुरांच्या मजुरीचे दर वाढले आहे. नोकरदार वर्गांचा पगारही भरमसाठ वाढला आहे. उत्पन्न वाढले, पगार वाढले, मजुरी वाढली तरी प्रत्येक जण हा सध्या वाढत्या खर्चने त्रस्त झालेला दिसत आहे.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ व गॅसची दरवाढ ही आता लोकांसाठी नवीन राहिलेली नाही. घरगुती गॅस ११०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. परंतु याचे लोकांना काहीच घेणे देणे राहिले नाही. सर्वच वस्तूचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अन्नधान्य जीवनाचे वस्तूचा ही समावेश आहे. वाढत्या खर्चामुळे प्रत्येकाच्या उत्पन्नात मजुरी पगारात वाढ झाली असली तरी त्या वाढलेल्या पगारात उत्पन्नात व्यक्ती हा खुश व समाधानी दिसत नाही. कारण वाढत्या उत्पन्नाबरोबर महागाईमुळे खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे व त्यामुळे सर्वच हे आपापल्या ठिकाणी हे वाढत्या खर्चाने वैतागलेले दिसत आहे. आजच्या काळात लोकांना सुविधा पाहिजे. या सुविधे मध्ये मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनाच्या वापरामुळे व मोबाईलच्या वापरामुळे प्रत्येकाच्या घराघरातील सर्व वाढलेला दिसत आहे. त्याचब रोबर मुलाच्या शिक्षणाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लाखो रुपये दरवर्षी सर्व सामान्यांना शिक्षणावर खर्च करावा लागत आहे. शिक्षणाबरोबर आज आरोग्य चा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हॉस्पिटल मेडिकल व इतर आवश्यक तपासणी बरोबर उपचारासाठी लाखो रुपये खर्च येत आहे. तर प्रत्येकांना हा खर्च लागू असल्याने दवाखान्याच्या प्रचंड खर्चाने सर्व सामान्य नागरिक हे त्रस्त झाले आहे.

वाढत असलेल्या महागाई बरोबर वाढत्या खचार्मुळे उत्पन्न व खचार्चा मेळ बसविणे मध्यमवर्गीयांना, सर्वसामान्यांना, गोरगरीबांना कठीण झाली आहे. एकीकडे उत्पन्न वाढविण्यासाठी वाटेल ती मेहनत केल्या जात आहे. परंतू वाढलेले उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागत आहे व ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याचा विचार करण्याची वेळ ही आलेली आहे. परंतू आज सुविधा तसेच पैशाचा हिशोब न पाहता खर्च करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे व ही बाब दिवसेंदिवस वाढत जाणार असताना जुने दिवस पूर्वीचे दर व पूवीर्ची पद्धत ही इतिहास जमा होऊ लागली आहे. तर आज नव्या जोमाने प्रत्येकाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केल्या जातो. त्याच सर्वसामान्यांनाही नाईलाजाने का होईना खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या बाबींचा विचार झाला पाहिजे. परंतू हा विचार कोणी करावा हा ही प्रश्न आहे. परंतू एकंदरीत जर विचार केला तर दिवसेंदिवस वाढत जाणाºया महागाईमुळे व वाढत जाणाºया खर्चामुळे सर्वच जण हे त्रस्त आहे. परंतु नाईलाजाने का होईना या खचार्ला रेटून नेण्याचे काम आज प्रत्येक जण करीत असल्याचे दिसत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *