धान खरेदी केंद्रावर १८ हजाराहून अधिक शेतकºयांची नोंदणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये शासनाने शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक ३१ मे २०२३ पर्यत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात १८८ धान खरेदी केंद्र सुरू असून १८ हजार ४२० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस पाटील यांनी केले आहे. भंडारा तालुक्यातील १९ धान खरेदी केंद्रामध्ये २ हजार ७२ शेतकºयांची, मोहाडी तालुक्यातील २४ धान खरेदी केंद्रामध्ये ३८९ शेतकºयांची, तुमसर तालुक्यातील ३० धानखरेदी केंद्रामध्ये १ हजार ४०२ शेतकºयांची, लाखनी तालुक्यातील २२ धान खरेदी केंद्रामध्ये ५ हजार ८०४ शेतकºयांची, साकोली तालुक्यातील २७ धान खरेदी केंद्रामध्ये ६ हजार ३६३ शेतकºयांची, लाखांदुर तालुक्यातील २९ खरेदी केंद्रामध्ये ७२८ शेतकºयांची, पवनी तालुक्यातील ३७ केंद्रामध्ये १ हजार ६५४ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे व महानोंदणी अ‍ॅप व ईतर खरेदी केंद्रावर ८ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. जिल्हयातील ज्या शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झालेली नाही.

अशा सर्व शेतकºयांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी करिता जातांना शेतकºयांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रासह नोंदणी केंद्रावर जावून आपली नोंदणी करावी. तसेच ज्या सबएजंट संस्थांचे आय. डी. सुरू आहेत त्या संस्थांनी धान खरेदी सुरू करावी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *