जनावरांसाठी लावलेल्या वीजेच्या सापळ्यात अडकून शेतकºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वन्य जीवांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकºयाने शेतात जीवंत वीज तारा पसरवून ठेवल्या होत्या. मात्र त्याची तिळमात्रही कल्पना नसल्याने आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी निघालेल्या अन्य शेतकºयाचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. विजय तुळशीराम खोब्रागडे (५४ वर्षे) असे या शेतकºयााचे नाव असून ही घटना पवनी तालुक्यातील नेरला गावच्या शेतशिवारात घडली. शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले. शिवारातील शेतकरी दीपक बाबुराव खोब्रागडे हे आपल्या शेतावर जात असताना त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने नेरलाचे पोलिस पाटील रघुपती भोगे यांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जीवंत विजेचा तार त्यांच्या दोन्ही पायांना चिकटूून असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह काढण्यात आला. अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेतशवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटना स्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह ठाणेदार धनंजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी घनशाम ठोंबरे यांनी भेट दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *