टोमॅटो महागाईने लाल, किमतीने गाठली शंभरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पावसाचे पाणी पडून टोमॅटो खराब होत आहेत. किमतीच्या बाबतीत टोमॅटो सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने टोमॅटोकडेही गृहिणींनी पाठ फिरवली आहे. कोथिंबिरने तर आधीच किलोमागे दीडशेचा आकडा गाठला आहे. दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाºया टोमॅटोने शतक पार केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखणेमहागात पडणार आहे. टोमॅटो ८० ते १२० रुपये किलोमध्ये विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसला आहे. राज्यात विविध ठिकाणी दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी झाली. त्यामुळे दर वाढले. दरवाढीचा फटका बसला आणि ग्राहकांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली. एक महिन्यात टोमॅटोचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारात भाव ७० ते ८० रुपये किलो आहे. हवामानाच्या बेभरवश्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, दुसरीकडे ग्राहकांनाही वारंवार उद्भवणाºया दरवाढीने आर्थिक स्तरावर बराच ताण सहन करावा लागतो. त्यातही बरेचदा पैसे देऊनही वस्तू मनासारखी मिळत नाही. अशावेळी आता ग्राहक त्या वस्तूचा पर्याय शोधू लागले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *