महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून आता सक्रिय झाला असून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये जोरदार वाºयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ जूनपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केली आहे. डेहराडून, उत्तरकाशी, नेहमीप्रमाणे पहिल्या पावसानेच मुंबई पाण्यात तुंबल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान विदर्भापासून कोकणापर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया परिसरात काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातल्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

बंगालच्या उपसागरातील वाºयाच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला असून मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या आगमनामुळे देशभरात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली, यूपीपासून बिहारपर्यंत पाऊस पडत आहे. केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मान्सूनने दणका दिला आहे. पुढील चार दिवस नितल, टिहरी, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे. राजस्थानमध्येही पावसाळा सुरू झाला आहे. जयपूर, अजमेर, कोटा, भरतपूर आणि उदयपूरमध्ये पावसाची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

यावेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. पावसामुळे राज्यातीलअनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील एक आठवडा राज्यात हवामान खराब राहण्याचा अंदाज असून स्थानिक प्रशासनाने लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि वीज सेवाही विस्कळीत झाली आहे. याशिवाय बिहार, ओडिशा, आसाम, हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, पश्चिम मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार, पेरणीची लगबग सुरू

भंडारा : यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला आहे. दरम्यान, गुरुवारपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे शेतकºयांसह सर्वच नागरिक सुखावले आहेत. काही शेतकºयांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून कमी अधीक प्रमाणात संततधार पाऊस सुरू होता. ढगाळ वातावरण व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतल्या जाते. मात्र यावर्षी मान्सून तब्बल तीन आठवडे लांबल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. बहुप्रतिक्षेनंतर अखेर गुरूवारी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला. त्यानंतर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धान उत्पादक शेतकºयांनी धानाचे पºहे टाकणे सुरू केले आहे. मात्र, काही शेतकरी दमदार पावाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाला सुरूवात झाल्याने बाजारातील दूकानात तसेच फुटपाथवर रंगीबेरंगी छत्री तसेच रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. नाागरिकांचे अडगडीत पडलेले पावसापासून संरक्षण देणारे साहित्य बाहेर काढले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.