तिबेटचे आव्हान जगातील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-यांनी स्वीकारावे – खा. प्रफुल्ल पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन हजार वर्षापेक्षाही अधिक काळपर्यंत तिबेट हा एक स्वतंत्र देश म्हणुन भारत व चीन या दोन प्रबळ देशाच्या मध्ये एक शांतीपूर्ण व अहिंसक मध्यस्त देश होता. परंतु १९४९ मध्ये साम्यवादी चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि १९५९ पर्यंत संपुर्ण तिबेटवर चीनने आपला अवैध कब्जा केला आहे. जगातील बहुतेक राष्ट्र स्वतंत्र झाले आहेत. अशा वेळी २१ व्या शतकातही विस्तारवादी, साम्राज्यवादी चीनने तिबेटला गुलाम करुन ठेवले आहे. हे जगातील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाºयांकरिता एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान जगानी स्वीकारावे व भारतीयांनी सुध्दा तिबेट मुक्ती साधनेकरिता सहकार्य करावे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करुन शिक्षणाचा पाया मजबुत करावा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. भारत तिबेट मैत्री संघ व मनिष वासनिक परिवारांच्या संयुक्त विद्यमाने संताजी वार्डातील मंगलम रेसीडेंसीमध्ये आयोजित १० मार्च ह्या तिबेटी जनक्रांती दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्म्रुती दिनाच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम त्यांनी दलाई लामा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाजंली वाहुन कब्जा केल्यानंतर १० मार्च १९५९ रोजी तिबेटची राजधानी ल्हासा येथे चीनविरुध्द अभुतपुर्व उठाव झाला, त्याचे जनक्रांतीत रुपांतर झाले म्हणुनच १० मार्च हा जनक्रांती दिवस पाळला जातो. आतापर्यंत चीनने तिबेटच्या १२ लाख लोकांचे बळी घेतले आहेत. ६००० पेक्षा जास्त धार्मिक स्थळे व सांस्कृतीक संस्था नष्ट केल्या आहेत. शेकडो तुरुगांत खितपत पडले आहेत. मुलभत अधिकार व अन्याविरुध्द लढणाºयांना शिक्षा केली जाते. चीनच्या जुलमी राजवटीविरुध्द १५२ पेक्षा जास्त लोकांनी स्वत: आत्मदहन केले आहे. हिंदुचे पवित्र तिर्थ क्षेत्र कैलाश मानसरोवरला जाणाºया भाविकांना चीनने अनेक कडक निर्बंध लावले असून कैलाश मानसरोवराला सैनीकी छावणीचे स्वरुप प्राप्त करुन ठेवले आहे.

महेंद्र गडकरी, मन्साराम दहिवले व महादेव मेश्राम यांनीसुध्दा सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे संचालन अमृत बन्सोड यांनी तर प्रास्ताविक गुलशन गजभिये यांनी तसेच आभार मनिष वासनिक यांनी मानले. सदर कार्यक्रमाला सिमरन भारती, महादेव मेश्राम, एम.डब्लु दहिवले, प्रशांत सुर्यवंशी, अजय तांबे, सुशील नगराळे, मोरेश्वर गेडाम, आहुजा डोंगरे, अर्जुन गोडबोले यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *