२ हजाराच्या नोटासाठी ‘धावपळ’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सायंकाळी अचानक २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतर व्यवहारातून बाद होतील, अशी घोषणा केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या नागरीकांनी या नोटांद्वारे डिझेलपेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली. याशिवाय बिअरबार, हॉटेल, दारुच्या दुकानातही २ हजारांच्या नोटा मोठया प्रमाणात दिसु लागल्या आहेत. नोटबंदी निर्णयानंतर देशात चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला.

या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बँकांनीही या नोटा खातेदारांकडून घ्याव्यात व त्या पुन्हा व्यवहारात आणू नयेत. त्या रिझर्व्ह बँकेच्या खात्यात जमा कराव्यात, असे आदेश दिले आहेत. पुढील चार महिने नोटा बदलण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र, एका खातेदाराला एकाच वेळी १० नोटा बँक बदलून देणार आहे, ही बातमी वाºयासारखी पसरली. २ हजाराच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्या, अशा अफवा शहरात पसरल्या. मात्र, या नोटा व्यवहारात पुढील चार महिने सुरू राहणार असल्याने अनेकांनी आपल्याकडील दोन हजाराच्या शिल्लक नोटा बाहेर काढणे सुरू केले. अनेकजन पेट्रोलपंपावर इंधन फुल करून २ हजारांच्या नोटा देत असल्याचे दिसुन येत आहे. तर बिअरबारमध्ये सुध्दा ग्राहक आता २ हजारांच्या नोटा देत असल्याचे दिसुन येते.त्यामुळे व्यवहारातुन दिसेनाशी झालेली २००० नोट पुन्हा दिसु लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *