सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होणार?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाºयांना बहाल करा ही मागणी करत आहेत. सोबतच राज्य कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करा हे देखील मागणी कर्मचाºयांनी लावून धरली आहे. वास्तविक केंद्र शासनाच्या कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे तसेच देशातील बहुतांशी राज्यात सेवानिवृत्तीचे वय हे ६० वर्षे आहे. यामुळे राज्यातील राज्य कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले जावे अशी मागणी कर्मचाºयांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांची नुकतीच मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक पार पडली आहे. या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाºयांनी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले जावे या संदर्भात अभ्यासपूर्ण भूमिका मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढ्यात मांडण्यात आली. यावर मुख्यमंत्री महोदय यांनी प्राधान्याने कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी महासंघाला दिले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी देखील हजर होते.
यामध्ये महासंघाचे नेते ग. दि. कुलथे; अध्यक्ष विनोद देसाई, आदी लोक उपस्थित होते. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे या मुद्द्याव्यतिरिक्त महसूल विभागीय संवर्ग वाटपाच्या अधिनियमातून पदोन्नत अधिकाºयांना वगळणे; सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे २० लाख रुपये करणे या देखील अति महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली आहे. विशेष बाब अशी की मुख्यमंत्री महोदय यांनी या मागणीवर देखील सकारात्मकता दर्शवली असून यावर सखोल अशी चर्चा झाली आहे. एकंदरीत राजपत्रित अधिकारी महासंघाचे ही बैठक सफल ठरली. आता सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत शासन केव्हा निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.