लाखांदूर तालुक्यात १ वर्षात १८ शेतकºयांनी केली आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : गत काही वर्षापासून तालुक्यातील विविध गावातील १८ शेतकºयांनी विविध कारणांमुळे आत्महत्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या घटनेतील ६ शेतकºयांची आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाल्याची माहिती समोर आली असून यामधील ४ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या परिवाराला शासनाच्या महसूल विभागांतर्गत प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक सहायता देण्यात आली. तर २ शेतकºयांच्या कुटुंबांना येत्या काही दिवसांत आर्थिक मदत उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, गत काही वर्षांपासून कर्जबाजारी झालेल्या शेतकºयाने आत्महत्या केल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु काही घटनांमध्ये विविध कारणांमुळे शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारी ते आॅक्टोबर या कालावधीत लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूण १८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र, आत्महत्या केलेल्या शेतकºयांनी बहुतांशी विष प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र, विविध कारणांमुळे वरील आत्महत्यांपैकी एकूण ६ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पोलीस प्रशासनासह कृषी व महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या तालुक्यातील ६ शेतकºयांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, या कारवाईअंतर्गत तालुक्यातील एकूण ६ शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, ४ शेतकºयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *