प्लॅस्टिक वापर टाळा यावर समर्थ महाविद्यालय लाखनी द्वारे सायकल रॅलीचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅली दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर रॅली महाविद्यालयातून सकाळी १०.३० वाजता निघाली या रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीचे नेतृत्व कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. प्रा. लालचंद मेश्राम, प्रा. धनंजय गिरीपुंजे, प्रा युवराज जांभुळकर, प्रा अजिंक्य भांडारकर, रामभाऊ कोटांगले, यावेळी उपस्थित होते. लाखनी, गराडा, केसलवाडा, माडगी, टेकेपार, खुर्शीपार यामार्गे रावणवाडी येथे सकाळी ११.५० वाजता रॅली पोहोचली. वरील गावांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव, प्लास्टिक निर्मूलन जनजागृती, प्रदूषण मुक्त शहर, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, सायकल चालवा फिट रहा, हम सब एक है असे उद्देश समोर ठेवून सायकल रॅली काढण्यात आली.

सायकल रॅली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कापसे, ४ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूरचे कमांडिंग आॅफिसर कर्नल विशाल मिश्रा, सुभेदार मेजर सुखबीर सिंग यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजन नंतर रावणवाडी येथील निसर्गरम्य वातावरणाच्या विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला तसेच मनोरंजन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता दिसली. सायंकाळी ५.३० वाजता सदर रॅली रावणवाडी येथून खुर्ची पार टेकेपार माडगी, केसलवाडा गराडा मार्गे महाविद्यालयात परत आली. त्यानंतर या रॅलीमध्ये एकूण ३९ एनसीसी कॅडेटस उपस्थित होते ज्यामध्ये २५ मुले आणि १५ मुली उपस्थित होत्या. या रॅलीचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सीनियर अंडर आॅफिसर एस निर्वाण, ज्युनिअर अंडर आॅफिसर वैभव हम्बरे, सार्जंट आदित्य सार्वे, क्वार्टर मास्टर सीएचएम तुषार गिरीपुंजे, सी पी एल कांचन गायधने यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *