आज महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान

तालुका प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशिय प.पू.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत कांद्री येथील सर्व सेवकांच्या व ग्रा.पं.कांद्री यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ९ वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येईल. आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ ला मानव जागृती, धर्म रक्षण सामाजिक विकास,व्यसन मुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करुन देणारे गोरगरीब दु:खी मानवाला मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या पुण्याईने बउद्देशीशिय प.पू.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कांद्री येथील सर्व सेवकांच्या सहकार्याने भव्य सेवक सम्मेलन आणि भगवंताचे सामुहिक हवनकार्य होईल. बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ७ वाजता सामुहिक हवनकार्य. सकाळी ९ ते १२ वाजता शोभायात्रा. दुपारी १२ ते १२.३० वाजता दिप प्रज्वलन. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पं.स.सदस्य उमेश भोंगाडे हे करतील. दुपारी १२.३० ते १ वाजता स्वागत समारंभ चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घघाटक आध्यामिक प्रमुख मानव धमार्चेताई लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते तर ब.उ.प.पु.प. एक सेवक मंडळ मोहाडीचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

प्रमुख अतिथी आमदार राजु माणिकराव कारेमोरे, विधान प.सदस्य परीणय फुके, जि.प.सदस्य अनिता नलगोपुलवार, किरण अतकरी, जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, देवेंद्र ईलमे, सरपंच बैजू बंसोड, प्रमेश नलगोपुलवार, पोलीस पाटील प्रकाश तुपट, ग्रा.पं.कांद्रीचे सर्व सदस्य व सदस्या हे राहतील. प्रमुख पाहुणे ब.उ.प.पु.प.एक सेवक मंडळ मोहाडीचे उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, संचालक गुरुभाऊ शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, कोषाध्यक्ष कंठीराम पडारे, सहसचिव राजु पिलारे, संचालक एकनाथ जिभकाटे, राजुभाऊ माटे, सरस्वता माटे, मार्गदर्शक इंद्रपाल मते, प्रकाश निंबार्ते, कार्य.संघटक भूमेश्वर पारधी, संचालक नत्थुजी कोहाड,व्यवस्थापकभगवान पिलारे, संगणक चालक व्यवस्थापक लक्ष्मण माहुले, स्वप्निल बडवाईक, विजय निमकर, विनोद तांडेकर, विजय दमाहे यांची उपस्थिती राहील. दुपारी ४ वाजेपासून महाप्रसादाला सुरवात होईल. सायंकाळी ५ वाजेपासून भजन कार्यक्रम. सायंकाळी ७ वाजेपासून सास्कृतीक कार्यक्रम होईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *