चक्रवर्ती सम्राट राजाभोज सर्व समाजाचे राजे-पटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : क्षत्रिय चक्रवर्ती पोवार समाज संघठन पाचगाव द्वारा चक्रवर्ती साम्राट राजाभोज जयंती व पोवार समाज मेळावा मौजा पाचगाव येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम होते तर उद्घाटक म्हणून किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार शिशुपाल पटले होते. या निमित्ताने सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. सर्वप्रथम पोवार समाजाची कुलदेवता गडकालिका मातेची पूजा करण्यात आली. व चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

चक्रवर्ती सम्राट राजाभोज सर्वच क्षेत्रात निपुण होते, तसेच ते सर्व समाजाचे राजे असल्याने त्यांचे राजवटीत सर्व जाती धर्माचे लोकांना न्याय मिळत असे, त्यांचे राजवटीचा अनुकरण सर्वांनी केला पाहिजे तेव्हाच खºया अर्थाने त्यांचे जयंतीचे सार्थक होईल, असे आव्हान माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून केले. सम्राट राजाभोज संगीत, साहित्यिक तसेच अभियंता असे अनेक विषयांवर त्यांचे आजही आपल्या पिढीला उपयोगी पडतील असे अनेक लेख उपलब्ध असून त्यांचा अभ्यास आजच्या पिढीने केला पा-ि हजे, असे उद्बोधन चेतन भैरम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले. यावेळी शिक्षण सभापती रमेश पारधी, पोवार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वजित पुंडे यांनीही मार्गदर्शन केले.                                   आलेल्या पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सर्वश्री मुन्ना पुंडे, अरविंद पटले, सरपंच संतुलाल गजभिये, हिरदीलाल ठाकरे, मुरलीधर बघेले, चेतन तुरकर, महेश ठाकरे, मधुकर पटले, हेमेन्द्र रहांगडाले, अनिल रहांगडाले, छोटुजी रहांगडाले, सुरजलाल पटले, बकराम पटले, सौ.शिल्पा पटले, सौ.सुनीता रहांगडाले, सौ.शांतकला रहांगडाले, सौ.निर्जला पारधी, सौ.मंदा पटले, सौ.अनिता भगत, सौ.मंगला रहांगडाले, टेकेश रहांगडाले, तिनेंद्र तेंभरे, सुनील पटले व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *