शेतात काम करणाºया महिलेवर बिबट्याचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मांढळ येथिल शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज ३० आॅक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान घडली ज्योती ज्ञानेश्र्वर मुंदलकार वय ३८ वर्ष रा.मांढळ असे जखमी महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्र्वर रामकृष्ण मुंदलकार यांच्या मालकीच्या शेतात धान कापणी होऊन धानाची कळपा बांधण्याचे काम सुरू असताना शेतात अचानक बिबट्याने सर्व प्रथम ज्ञानेश्र्वर मुंदलकार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्ञानेश्र्वरयाने बिबट्याला पळवून लावले .जवळच काही अंतरावर काम करीत असलेल्या ज्ञानेश्र्वर यांची पत्नी ज्योती ज्ञानेश्र्वर मुंदलकार यांच्या डाव्या बाजूच्या पायाला बिबट्याने पंजा मारीत सदर महिलेला जखमी केले आहे.

सदर घटना लक्षात येताच शेत परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पळवून लावले. सदर जखमी महिलेस लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृति खालवली आहे. सद्या महिलेवर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय ठाकरे व डॉ.रोशणी ठाकरे हे उपचार करीत आहेत. घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला मिळताच लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी.डी. हत्ते, बी.एस. पाटील, वाहन चालक प्रफुल राऊत यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *