गोंदिया (बिरसी) विमानतळावरून नियमीत प्रवासी विमान सेवा सुरु होणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमान स्थळावरून फ्लॉय बिग कंपनीने गोंदिया, इंदोर, हैद्राबाद अशी सुरु झालेली विमान सेवा फक्त काही महिन्याच्या औटघटकेची ठरली. विमानतळाची अत्याधुनिकता व विमान सेवा सुरु करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने या विमानतळा वरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने अनुकूलता दर्शविल्याची आहे. या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरू होणार आहे. बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स नियमित उड्डाण भरण्यास सज्ज झाल्याने यामुळे क्षेत्रातील नागरिक, शेतमाल, व्यापाराला चालना मिळणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, मागील वर्षी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, ही सेवा प्रवाशांसाठी केवळ औटघटकेचीच ठरली. मात्र काही महिन्यांतच ही सेवा बंद झाली. त्यानंतर आता विमानतळा वरून प्रवासी विमान वाहतूक सेवेच्या उड्डाण भरण्यास कामठा-परसवाडा मागार्चा खोडा निर्माण झाला होता.

हि अडचण खा. प्रफुल पटेल यांनी दूर करून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात यावी, यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा केला. तसेच काही विमान कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर इंडिगो कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास अनुकुलता दर्शविली आहे. बिरसी विमानतळाकडे जाणाºया मार्गावरूनच कामठा – परसवाडा हा मार्ग गेला आहे. या मागार्मुळे रन वेच्या रूटमध्ये अडचण निर्माण होत आहे. हि बाब माजी आमदार श्री राजेंद्र जैनयांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यात कुठल्याही मागार्ची अथवा गावाची अडचण येऊ नये; तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाची काही नियमावली आहे; मात्र त्यामुळेसुद्धा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास अडचण निर्माण होत होती. आता ही अडचणसुद्धा खा.प्रफुल यांच्या प्रयत्नाने दूर केली जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *