काळे कायदे रद्द करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने राज्य शासनाने येणाºया अधिवेशन काळात कृषी केंद्र धारकांच्या हक्कावर पाणी फेरणारे पाच काळे कायदे अमलात आणण्याचा त्यांचा मानस असून हे पाचही काळे कायदे कृषी निविष्ठा विक्री करणाºयाना भयंकर असे घातक आहेत यापुढे आपण आपला व्यवसाय करणे अशक्य होऊन जाणार आहे . त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पाचही काळे कायदे रद्द करण्यासाठी दिनांक २, ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी ला आपण सर्वांनी कृषी केंद्र दुकाने बंद ठेवण्यासंबंधी आज ३० आॅक्टोंबर रोजी सोमवारला पंचायत समिती चे कृषी अधीकरी राऊत, तालुका कृषी अधिकारी शहारे, श्री घावडे व तहसील कार्यालयाचे तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे मोरेश्वर बोरकर, तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे दिलीप चून्ने, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम लांजेवार . सचिव योगेंद्र ब्राह्मणकर, जिल्हा सदस्य प्रमोद कलंत्री, आणि तालुक्यातील सर्व कृषि निविष्ठा धारक उपस्थित होते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *