ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज बिल थकीत असल्याने महावितरण कडून ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी, गत १५ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्राम पंचायत गाठून ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढला आणि पाण्यासाठी मागणी केली. तथापि, येथील ग्राम सेवक तथा ग्राम पंचायत प्रशासनाने पाणी पट्टी कर थकीत असल्याचे कारण पुढे करीत असताना ग्राम पंचायत प्रशासनाने पाणी पट्टी कर वसुलीकरिता कसलेही प्रयत्न केले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. सदर प्रकार लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील असून ३ आॅक्टोंबर रोजी येथील महिला ग्राम पंचायतीवर धडकल्या. प्राप्त माहितीनुसार, नळाद्वारे गावात पाणीपुरवठ्यासाठी ग्राम पंचायत अंतर्गत नळ योजना आखली असून गावातील नळांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गत १५ दिवसापासून येथील पाणीपुरवठा यंत्रनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी, येथे पाण्याची भीषण टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाणीटंचाई दरम्यान, येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे, गत १५ दिवसांपासून येथे भेडसावत असलेल्या पाणी टंचाईला त्रस्त महिलांनी थेट ग्राम पंचायातीवर घागर मोर्चा नेला असून तत्काळ पूर्विवता पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, नुकत्याच आलेल्या वीज बिलानुसर येथे ३५९९० रुपयाचे वीज बिल थकीत असून पूर्वसूचना नोटीस न देता महावितरण कडूनवीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती ग्राम पंचायत प्रशासनाकडून मिळाली.

“येथील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने गत १५ दिवसांपासून आमच्या नळाला पाणी येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत असून भटकंती करून हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे. परिणामी आम्हाला मानसिक त्रास होत असल्याने आम्ही महिला ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा आणला आहे. लवकरात लवकर आमचे नळ सुरू करून दयावे हीच आमची मागणी आहे.”

-कांचन चुंन्नीलाल पारधी गृहिणी, परसोडी/नाग

“६०६०५ रुपयांचा धनादेश २० सप्टेंबर रोजी बँकेमध्ये लावला आहे. मात्र, चेक जमा व्हायचा असल्याने ही समस्या उद्भवली आहे. चेक जमा झाला की वीज बिलाचा भरणा करण्यात येईल.”

-एम.आर. बडवाईक ग्रामसेवक, परसोडी/नाग

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *