सूरेवाडा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील सूरेवाडा येथे उपसा सिंचन योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे जवळपास २८ गावातील ५००० हेक्टर जमिनीवरील शेतक-यांना लाभ होणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पाठपुराव्यामुळे हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला. भंडारा तालुक्यातील ७, मोहाडी तालुक्यातील २० आणि तिरोडा तालुक्यातील १ अशा २८ गावातील जवळपास ५००० हेक्टर शेत जमिनीचे सिंचन करण्याची क्षमता असलेल्या भंडारा तालुक्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या मान्यतेचा विषय शासन मान्यतेसाठी थांबलेला होता. या मागणीसाठी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला होता तसेच प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रकल्पाची आवश्यकता मांडली. उपमुख्य सचिव श्री भूषण गगराणी यांच्या कडेही या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला ३३६.२२ कोटी रुपयांची प्रशास्- ाकीय मान्यता प्रदान करण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्प क्षेत्रात येणाºया गावातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुनील मेंढे यांनी आभार मानले आहेत. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *