जिल्हा वकील संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा व सत्र न्यायालयात आज ६ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा वकील संघातर्फे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लीहून सामान्य नागरीकांना हक्क व अधिकाराची जाणीव करून दिली भारतीय राज्यघटना सर्वांना न्याय समता ,बंधुभाव सामाजीक बांधिलकी शिकविणारी व व्यक्तीस्वातंत्रता देणारी आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक दर्जा उंचावणारी व सर्व सामान्य लोकांना संधी देणारी तळागाळातील लोकांची हितकारक ठरलेली आहे. त्यामुळेच बाबासाहेबांना भारतीय राज्य घटनेचे जनक म्हटल्या जाते अशा या महामानवास भंडारा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवि वाढई यांंचे नेतृत्वात मानवंदना देण्यात आली .यावेळी बारचे सदस्य अ‍ॅड. अजय गभने, अ‍ॅड..राकेश सक्सेना, अ‍ॅड. कैलास भुरे,अ‍ॅड. किशोर लांजेवार, अ‍ॅड. तहीलयानी,अ‍ॅड. तिडके, एमएम चव्हाण ,अ‍ॅड. राजेश राऊत, अ‍ॅड. चोपकर, अ‍ॅड.निला नशीने,अ‍ॅड.. स्वामी, अ‍ॅड.बोरकर, अ‍ॅड.खटी ,अ‍ॅड. गायधनी, अ‍ॅड.अनिल सतदेवे, अ‍ॅड. मुरलीधर ठाकरे, अ‍ॅड.चौरे, अ‍ॅड. गजभीये, अ‍ॅड. प्रशांत मेश्राम तसेच वकील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *