अन्याय-अत्याचाराविरोधात सर्व समाजाने एकत्रित लढा उभारण्याची गरज !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्या देशात दलित आदिवासी मुस्लिम व ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा सुरू केला असून दलित आदिवासी मुस्लिम व ओबीसी समाजाच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतल्या जात आहे. बहुजन समाजाला रोजगारापासून वंचित करून त्यांना आर्थिक गुलाब बनवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.याचा विरोध करून न्याय मिळविण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येवुन लढा देणे गरजेचे असल्याचे मत संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा च्य पदाधिकाºयांनी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देशातील नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला हिंदू धर्म पिठाच्या धर्मगुरूकडून मंत्रोपचार करण्यात आला व संसद भवनाची स्थापना केली गेली यामध्यमातुन नव्याने मनुवाद व धार्मिक हुकूमशाही लादण्याचे केंद्र सरकारकडून प्रयत्न होत आहे.

मध्य प्रदेश राज्यात एका आदिवासी तरुणावर सुवर्णांकडून मूत्र विसर्जन केले गेले तर त्याच राज्यात एका आदिवासी तरुणाला निर्वस्त्र करून त्याच्या गळ्यात चपलाची माळ घालून गावातुन त्याची धिंड काढण्यात आली. उत्तर प्रदेशात देखील मुस्लिम बांधवाला बेदम मारहाण करून त्याला पायाचे तळवे चाटण्यास भाग पाडले तर तिथे एका दलित युवकाला बेदम मारहाण करून त्याला थुंकी चाटण्यास भाग पाडण्यात आले. महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली म्हणून नांदेड येथे अक्षय भालेराव नामक युवकाची हत्या करण्यात आली अशा अनेक घटना आपल्या देशात घडत असुन या सर्व भाजपा शासित राज्यात होत असल्याचे दिसून येतात.

देशात दलित आदिवासी मुस्लिम यांच्यावर अन्याय करणाकयांवर कठोर शिक्षा करण्यात यावी ज्या राज्यात अशा घटना होत आहेत त्यांचे शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी व खाजगीकरण थांबवावे, गुगलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर आहे ते हटविण्यातयावे यासह इतरही मागण्यांना घेवुन संविधान बचाव संघर्ष समिति भंडारा तर्पेष्ठ दिनांक २ आॅगस्ट रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय पुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्र परिषदेला भंडारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे मोहमद सरफराज शेख, आदिवासी समाजाचे अजबराव चिचामे, बिसनजी सय्याम, प्रभाताई पेंदाम, अशोक उईके,ओ बी सी नेते श्रीकृष्ण पडोळे, संजय मते, डी .पी .ढगे, बुद्धिस्ट समाजाचे रोशन जांभुळकर, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्ने, हिवराज उके, आसित बागडे, गोवर्धन कुंबरे, संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *