भरधाव टँकरने दुचाकीस्वार तरुणीला चिरडले

नागपूर :भरधाव टँकरने एका दुचाकीस्वार तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना रविनगर चौकात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्कृती मिश्रा (रा. फ्रेंड्स कॉलनी) हे त्या दुदैर्वी तरुणीचे नाव आहे. ती धरमपेठेत शिकवणीकरता गेली होती. मित्रासह दुचाकीने ती घरी परत जात होती. रविनगर चौक ओलांडत असतानाच लॉ कॉलेज चौकाकडून एलआयटीकडे जात असलेल्या टँकरने दुचाकीचा धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक तरुण एकीकडे संस्कृती दुसºया बाजूला संस्कृती पडली. टँकर तिला चिरडून पुढे निघून गेला. यावेळी पाऊस सुरू होता. अपघात झाल्याचे दिसताच लोक धावले. कुणीतरी पोलिसांना कळवले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी तरुणाची विचारपूस केली. मृत तरुणीचे नाव तसेच शिकवणीहून घरी जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घटनास्थळी अत्यंत करुण व धक्कादायक दृष्य होते. दुचाकी चालक तरुण किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी तातडीने आरोपी वाहनाचा तपास सुरू केला. अमरावती मार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. ट्रक, टिप्पर, बस आदी जड वाहनांची वर्दळ सतत असते. त्यामुळे जड वाहनांनी तेथून वाहन सुरक्षितपणे चालवायला हवे. पण, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पादचारी तसेच लहान वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच तेथून जावे लागते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.