नागपुरात होणार १२ एकर जागेत क्रीडा व सांस्कृतिक क्लब

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपुरात १२ एकर परिस- रात क्रीडा व सांस्कृतिक क्लबची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच सामान्य लोकांसाठी हा क्लब खुला केला जाणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात अनेक खासगी क्रीडा व सांस्कृतिक क्लब असून त्याचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे १२ एकर परिसरात क्रीडा व सांस्कृतिक क्लबची निर्मिती केली जाणार आहे. साधारणत: क्लबच्या सदस्य होण्यासाठी २५ ते ५० लाख रुपये लागतात, मात्र आम्ही एक हजार लोकांना सदस्य करणार असून त्यांच्याकडून सुरुवातीला दहा लाख रुपये घेणार आहेत. हा क्लब विकसित झाल्यानंतर तो सामान्य नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने शुल्क आकारले जाईल. क्लबमध्ये जीमसह व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, खो खो, कबड्डी आदी खेळ खेळण्याची व्यवस्था असेल. शिवाय ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांसाठी वेवेगळे कक्ष राहणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि विविध कला प्रशिक्षणाची सोय या ठिकाणी केली जाईल. शंभर ते दीडशे कोटीचा हा प्रकल्प असून यासाठी जागा जवळपास निश्चित करण्यात आली असून त्याची निर्मिती लवकरच केली जाणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *