संवैधानिक अधिकारांसाठी ओबीसींसह समस्त बहुजनांना आता संघर्षाशिवाय पर्याय नाही : डॉ. बबनराव तायवाडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : आपल्या संवैधानिक अधिका- रांसाठी ओबीसींसह समस्त बहुजनांना आता फौलादी एकजुट व संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे विचार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले. ते संविधान चौकात आरक्षण हक्क कृती समिती आणि विविध सामाजिक-कामगार-कर्मचारी संघटनाच्या वतीने आयोजित विराट मोर्च्याच्या समापन सभेत मोचेर्कारींना संबोधित करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमती कमलाताई गवई होत्या. दुपारी ११.३० वाजता आरक्षण हक्क कृती समिती द्वारे आयोजित एक विरात मोर्चा हजारो मोचेर्कारींना घेवून यशवंत स्टेडीयम येथून निघून संविधान चौकात पोहचला. आरक्षण हमारा हक है, जय संविधान, जय ओबीसी, जय भीम, कामगार एकता जिंदाबाद अशा विविध नारेबाजींसह घोषणांचे फलक व पोस्टर घेवून मोर्चेकरी व्हेरायटी चौकातून संविधान चौकात पोहचल्यावर या मोच्यार्चे मोठ्या सभेत रुपांतर झाले. डॉ तायवाडे पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने कलम ३४०,३४१ व ३४२ अन्वये अनुक्रमे ओबीसी, एससी व एसटी प्रवगार्तील लोकांना संवैधानिक आरक्षण बहाल केले आहे. परंतु मागील ७२ वर्षात या देशातील राज्यकर्त्यांनी या मागसलेल्या ८५ टक्के बहुजन समाजातील लोकांबरोबर संवैधानिक न्याय केलेला नाही. यासाठी तीव्र संघर्षाशिवाय आता पर्याय नाही.

समानता व बंधुता हे आपल्या संविधानाचे तत्व आहे. परंतु हेच तत्व पायदळी तुडविल्या जात आहे. या विरोधात लढा देणे ही आपली जवाबदारी आहे. यावेळी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, भीमराव आंबेडकर, सुषमा भड, अविनाश काकडे, एस.के.भंडारे, जावेद पाशा, जेष्ट पत्रकार रणजीत मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, कुलदीप रामटेके, छाया खोब्रागडे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. एम.एस.वानखेडे, सीताराम राठोड, अमरावतीचे एस.एस.वानखेडे याच्यासह अनेक वक्त्यांनी उपस्थित मोर्चेकरी यांना विविध समस्यांवर संबोधित केले. मोर्चा व कार्यक्रमाची भूमिका कर्मचारी नेते अरुण गाडे यांनी मांडली, संचालन प्रा.रमेश पिसे यांनी केले. मोर्चेकरी व उपस्थितांचे आभार राहुल मून यांनी मानले. मोर्च्यात शरद वानखेडे, राजेश राहाटे, राजू चौधरी, अनंत बारसागडे, संजय मांगे, शाम लेडे, उदय देशमुख, नंदा देशमुख, खुशाल शेंडे, गणेश नाखले, हरीश उईके, महेश बामनोटे, अशोक सरस्वती, ज्ञानेश्वर रक्षक, बलदेव आडे,सुधाकर तायवाडे, निलेश कोढे,संजय टीचकुले, रामभाऊ इरखेडे, प्रेमराज जिचकार, विलास भोंगाडे, उत्तम शेवडे, अ‍ॅड. समीक्षा गणेशे, अर्चना बरडे, जिंदा भगत, हरीश रामटेके यांच्यासह अनेक लोक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आशा वर्कस व सिटू संघटना सह कास्ट्रईब आणि इतर कामगार व कर्मचारी संघटना व विविध सामाजिक व पुरोगामी संघटना या मोर्च्यात मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *