राज्यात अटी नाकोटिक्स टास्क फोस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अंमली पदार्थ व्यापारात पोलिस असो वा डॉक्टर, कुणाचाही संबंध आढळल्यास, पुरावे असल्यास थेट बडतर्फ केले जाईल, कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिला. राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मूळ प्रश्न प्रवीण दटके, महादेव जानकर, प्रसाद लाड व इतर सदस्यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय ड्रग्ज प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू असून पुरावे असतील तर बडतर्फ केले जाईल. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपासात ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी वपोलिस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही.

आरोपीच्या संरक्षणातील अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने दोन पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले असून सहा कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. राज्यातील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांचा पदभार काढून विभागीय चौकशी केली जाईल. अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्याच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. नार्को टेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार आहे. राज्यात अँटी नार्कोटिक्स सेल आहे. त्याऐवजी आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे. तो नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोसी संपर्कात राहील, असे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सचिन अहीर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब, अरुण लाड यांनी उपप्रश्न विचारले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *